रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेंतर्गत कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने ४७ सागरी कासव पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रात सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील ४७ कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आली आहेत.

गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर कांदळवन दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्या वतीने सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीम अंतर्गत अंडी उबवणी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षित प्रजाती तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घरट्यांमधील सुमारे ४७ कासवांची पिल्ले संरक्षित करण्यात आली होती. या संरक्षित पिल्लांना सुरक्षितरित्या गणपतीपुळे अंडी उबवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष कामगिरीने गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आली आहेत.

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रामध्ये सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती त्यातील ४७ कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती कासव मित्र वीरेंद्र सुर्वे यांनी दिली आहे. या अंडी उबवणी केंद्रामध्ये समुद्री कासवांची पिल्ले घरट्यांमध्ये योग्य प्रकारे संरक्षित करण्यासाठी कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे.

Story img Loader