रत्नागिरी : खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या रस्त्याजवळच असलेल्या एका जंगलामध्ये बुधवारी मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळतात खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पहाणी केली. यावेळी रस्त्याजवळच असलेल्या जंगलात मानवी कवटी आढळून आली असून जंगलात एका झाडाला दोरी लटकल्याची देखील पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या ठिकाणी पोलिसांना एक बॅग आणि रेनकोट देखील सापडला आहे. मात्र या ठिकाणी सापडलेला सापळा कोणाचा आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नसून हा सापळा एका पुरुषाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा सापळा या ठिकाणी कसा आला याचा शोध पोलीस घेत आहेत.
आणखी वाचा-विसर्जनादरम्यान राज्यात २१ जणांचा मृत्यू
जंगलाच्या ठिकाणी झाडाला आढळलेली दोरी व कुजलेल्या अवस्थेत आढळलेली कवटी यावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी सापडलेली बॅग व रेनकोट कोणाचा? इतक्या घनदाट जंगलात हे सर्व कुठून आले? याबाबत खेड पोलीस तपास करीत आहेत.