सांगलीतील शिराळा तालुक्यातील खुजगाव येथे वीजेच्या शार्ट सर्किटने आग १३ गोठ्यांना आग लागून चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. नुकसानग्रस्त गोठ्यांची पाहणी करून आमदार मानसिंगराव नाईक यांनी मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. खुजगाव येथे अचानकपणे जनावरांच्या गोठ्याला आग लागली. या परिसरात जनावराचे तेरा गोठे असून या आगीत सर्वच गोठ्यांना आगीची झळ बसली. आगीत एक जनावर गंभीर रित्या भाजले आहे. या आगीत सुमारे १४ लाखाचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा- VIDEO: ‘आज जेल, कल बेल’, ‘बादशाह बोलते, चाकू मारते’; चक्क पोलीस व्हॅनमध्ये बसून आरोपीची डायलॉगबाजी, व्हिडीओ व्हायरल

Maharashtra tiger deaths
Tiger Deaths : राज्यात १० दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…
LA Wildfires reason
१६ हजार एकरवर अग्नितांडव; कलाकारांसह अनेकांची घरे भस्मसात, अमेरिकेतल्या भीषण आगीचे कारण काय?
Manja is deadly for birds Firefighters rescue 160 birds in four years
पक्ष्यांसाठी मांजा जीवघेणा! चार वर्षांत अग्निशामक दलाकडून १६० पक्ष्यांची सुटका
Dogs Killed
Dogs Killed : अमानवी कृत्य… कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून पुलावरून फेकून दिलं; २१ श्वानांचा मृत्यू, २१ गंभीर
H5N1 tigers, tigers, zoos , tiger news, tiger latest news,
“एच५एन१” ने तीन वाघ मृत्युमुखी, राज्यातील प्राणिसंग्रहालयांना “हाय अलर्ट”
citizens bitten by animals in maharashtra
राज्यभरात कुत्रे, मांजर, माकडांमुळे नागरिक त्रस्त… चावा घेतल्याने…

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँंकेचे अध्यक्ष आ. नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकर्‍यांना दिलासा देत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. या आगीमध्ये पांडुरंग बंडू सावंत, तुकाराम दादू सावंत, आनंदा दादू सावंत, शामराव नामदेव सावंत, संतोष शंकर सावंत, गुंडा तुकाराम सावंत, बाळकू यशवंत सावंत, दगडू यशवंत सावंत, निवृत्ती ज्ञानदेव सावंत, अशोक दगडू सावंत, संजय दगडू सावंत, पांडुरंग दगडू सावंत, संभाजी यशवंत सावंत यांच्या १३ जनावरांच्या गोठयांना आग लागली.

हेही वाचा- Shraddha Murder Case: आफताबची नार्को टेस्ट रद्द, नेमकं काय घडलंय?

गावातील युवक व शेतकर्‍यांनी प्रसंगावधान राखून आगीतून ३० जनावरे सुखरूप बाहेर काढली. या आगीत जनावरांच्या शेडसह भात, पिंजर, कडबा, गवत, शेती औजारांसह संसार उपयोगी साहित्य जळून नुकसान झाले. सर्व जळीतग्रस्तांना शासकीय पातळीवरून जास्तीतजास्त मदत मिळून देऊ, असे आडासन आमदार नाईक यांनी भेटी दरम्यान दिले. यावेळी माजी उपसरपंच तुकाराम सावंत, उपसरपंच विकास ढेकळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader