किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर पुस्तक पुजनाच्या निमित्त अस्थिविसर्जन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी आता महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी चौघांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

   किल्ले रायगडावर ८ डिसेंबर २१ रोजी काही जण शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ सरसेनापती हंबीरराव या पुस्तकाचे पुजन करत होते. मात्र यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे तिथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींच्या लक्षात आले. त्यावर हे तुम्ही काय करत आहात म्हणून त्यांनी त्यांना जाब विचारला यावरून दोन्ही गटात वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना रोखले होते. पुस्तक आणि पुजनासाठी आणलेले साहीत्य ताब्यात घेतले. होते. पुस्तक पुजनाच्या निमित्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थिंचे शिवसमाधी जवळ विसर्जन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी शिवप्रेमींनी केला. त्यामुळे काही काळ गडावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी कऱण्याची मागणी शिवप्रेमींनी होती. 

   यानंतर महाड तालुका पोलीसांनी तपास करून चार जणांविरोधात भादवी कलम १५३(१)(अ)(ब), २९५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

दरम्यान पोलीसांनी सामाजिक अशांतता निर्माण करणे, लोकभावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four arrested for immersing bones in raigad msr