सांगली: जिल्ह्यात दोन ठिकाणी गांजा लागवड उघडकीस आणून सुमारे दीड लाखाची गांजाची झाडे पोलीसांनी जप्त केली आहेत. संख (ता. जत) येथे तीन सख्ख्या भावांना तर वाळवा येथे एकाला गावठी पिस्तुलासह अटक करण्यातआली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत माहिती अशी, कर्नाटकच्या सीमेलगत जत तालुक्यातील सीमा परिसरात गांजाची लागवड केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी संख येथे संयुक्त कारवाई करीत गांजा लागवड उघडकीस आणली. राजेंद्र बिरादार, श्रीकांत बिरादार व शटगोंडा बिरादार या तीन सख्ख्या भावांच्या शेतावर छापा टाकला. यावेळी उसाच्या फडात गांजा लागवड केल्याचे आढळून आले. लहान मोठी सात ते आठ फूट उंचीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याचे वजन २४ किलो ९ ग्रॅम असून त्याचे मूल्य १ लाख २० हजार रूपये आहे.

आणखी वाचा-दहा महिन्यात दुपटीचे आमिष दाखवून ९४ लाखाची फसवणूक

तसेच वाळवा नागठाणे रस्त्यावरील वाळवा गावच्या हद्दीमध्ये हर्षवर्धन होरे याच्या शेतात गांजा लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टा पोलीसांनी छापा टाकला असता २ किलो ९०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आढळून आली. होरे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूसही मिळाले. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.