सावंतवाडी : बांदा येथे आढळलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना दोन वर्षे साधी कैद व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड न्यायालयाने शनिवारी ठोठावला आहे. दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या बांगलादेशी नागरिकाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पळालेला बांगलादेशी मोहम्मद शांतो सलीम सरकार (वय २० मूळ राहणार बांगलादेशी सध्या राहत होता बांदा बळवंत नगर ता. सावंतवाडी) याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आवारातील स्वच्छतागृहातूंन तो पळून गेला होता. म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
Kissing is not sexual Assault Madras high Court
Madras High Court: “जोडप्याने एकमेकांचे चुंबन घेणे स्वाभाविक,” उच्च न्यायालयाने रद्द केला लैंगिक अत्याचाराचा खटला

हेही वाचा…Ajit Pawar : “कोण कुणाला ढेकूण म्हणत आहेत, एकमेकांचे कपडे काढायचे…”, ठाकरे-फडणवीस वादावर अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान अन्य गुन्ह्यांमध्ये काल शनिवारी चौघां बांगलादेशी नागरिकांना शिक्षा झाली होती. सावंतवाडी न्यायालयाच्या आवारातील स्वच्छतागृहात मोहम्मद शांती सलीम सरकार हा बांगलादेशी बाथरूमला गेला असताना बाथरूमच्या खिडकीतून पळाला होता. बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याने पोलिसांना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान सावंतवाडी न्यायालयाने काल शनिवारी चार बांगलादेशी नागरिकांना शिक्षा सुनावली होती. भारतात बेकायदा वास्तव्यात राहत असलेल्या व्यक्तींचा पोलीस यंत्रणा शोध घेत असता २३ फेब्रुवारी रोजी बांदा बळवंतनगर येथे भाड्याने राहणाऱ्या सहा बांगलादेशी व्यक्ती आढळून आल्या होत्या त्यांच्याकडे भारतात येण्यासाठी, वास्तव्यात राहण्यासाठी आवश्यक कोणतेही कागदपत्रे मिळाले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मद शांतो सलीम सरकार (२०) मोहम्मद रजो मोहम्मद शाहिद मुल्ला( २८), मोहम्मद रुबेल उर्फ आसादउल हारून खान (२६), मोहम्मद शाहिदुल उरमणीरूल हारून खान( २४), मोहम्मद अन्वर अब्दुल हाशिम अकोंड( ६५) व मोमताज बेगम मोहम्मद अन्वर अब्दुल हाशिम अकोंड (४६) या सहा बांगलादेशी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा…Devendra Fadnavis : “चांदीवाल आयोगाचा अहवाल मविआच्या काळातच आला”, देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज अशाप्रकारे…”

या गुन्ह्याची सावंतवाडी न्यायालयात सुनावणी झाली. या सहा बांगलादेशी नागरिकापैकी चौघांकडे भारतात वास्तव्यात राहण्याचा कोणताही पुरावा, पासपोर्ट आदी नसल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने चौघांना दोन वर्ष साधी कैद व प्रत्येकी सहा दहा हजार रुपये दंडची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा…Prakash Ambedkar : “ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका, कुणबी मराठा हे खरे…”, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य

सरकार पक्षातर्फे अँड धनश्री गोवेकर यांनी काम पाहिले तर मोहम्मद अन्वर अब्दुल हासीन अकोंड (६५) व मोमताज बेगम मोहम्मद अन्वर हासीन अकोंड (४६) या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या वतीने अँड स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.