अलिबाग –  रायगड पोलीस दलात झालेल्‍या भरतीमधील बरेगसगिरी उघड झाली आहे. भरती प्रक्रियेत चार उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्‍या धक्‍कादायक बाब समोर आली आहे. या चारही उमेदवारांविरोधात फसवणूकीचा गुन्‍हा दाखल करून त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे. या प्रकरणात आणखी का‍ही नावे पुढे येण्‍याची शक्‍यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हम साथ साथ है! फडणवीसांचा फोटो झळकावत शिंदे गटाची आज डॅमेज कंट्रोल जाहिरात

रोहित बबन मगर रा. सोलापूर केशव गिरजाजी मुरमुरे रा. नांदेड, गोविंद सुखदेव ठाणगे रा. बीड, अच्युत भागवत माने रा. बीड अशी या उमेदवारांची नावे आहेत. राज्यात शासनाने पोलीस भरती पक्रिया राबवली. रायगड पोलीस दलात २७२ जागांसाठी डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी हजारो उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा मध्ये पात्र झालेल्या २७२ जणांची अंतिम यादी पोलीस प्रशासनाने जाहीर केली होती. या भरतीत प्रकल्पग्रस्तांसाठीही राखीव जागा असल्याने प्रकल्पग्रस्त उमेदवार भरतीत उतरले होते.

हेही वाचा >>> “सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल देवेंद्र फडणवीसांच्या…”, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य, म्हणाले…

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीत बोगस प्रमाणपत्र प्रकरण समोर आले होते. यामध्ये अलिबागमधील पोलीस शिपाई याला अटक झाली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्त पात्र उमेदवार यांचे प्रमाणपत्र तपासणीसाठी रायगड पोलिसांनी बीड, सोलापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी आपले पथक पाठवून माहिती गोळा केली होती. या माहितीत रोहित बबन मगर, सोलापूर केशव गिरजाची मुरमुरे, नांदेड, गोविंद सुखदेव ठाणगे, बीड, अच्युत भागवत माने, बीड या चौघांनी बोगस प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केल्‍याची बाब समोर आली. अलिबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात भा. दं. वि.  ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कोणी दिले, यासाठी किती रक्कम दिली याबाबत पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four candidate arrested for submitting fake certificate to get job in raigad police zws
Show comments