कराडचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाई यात्रा येत्या रविवारपासून (दि. ५ ) सुरू होत असून, बुधवारी (दि. ८) यात्रेचा मुख्य दिवस आहे. सालाबादप्रमाणे कृष्णाबाई उत्सव कमिटीने चार दिवस विविध कार्यक्रम आयोजिले आहेत.
रविवारी (दि. ५) दुपारी ३ वाजता श्री स्वरांजली महिला भजनी मंडळ व दुपारी ४ वाजता श्रीराम महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी साडेसात वाजता ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे ‘यशवंतराव साहित्यिक व राजकारणी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (दि. ६) सकाळी नवचंडी याग, दुपारी ३ वाजता रामकृष्ण गीता मंडळाचा भजनाचा व स्तोत्र पठणाचा कार्यक्रम, दुपारी ४ वाजता श्रीरामकृष्ण महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी साडेसात वाजता डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र प्रस्तुत संगीताचा सुमधुर कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (दि. ७) दुपारी ३ वाजता श्री ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळाचा व दुपारी ४ वाजता सुरश्री महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, दुपारी ५ वाजता स्त्रियांचे हळदी-कुंकू, सायंकाळी साडेसात वाजता ‘हास्य षटकार’ हा संगीतमय हास्य कार्यक्रम होणार आहे.
यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी (दि. ८) असून, या दिवशी दुपारी १२ ते साडेबारा श्री कृष्णाबाई सांस्कृतिक केंद्र (जुने) येथे महाप्रसादाचा कार्यक्रम, दुपारी ३ वाजता श्री संवादिनी महिला भजनी मंडळ व दुपारी ४ वाजता श्री शारदा महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच उत्सवकाळात दररोज सकाळी श्रींची महापूजा, अभिषेक, दुपारी साडेअकरा वाजता महाप्रसाद, आरती, सायंकाळी ५ वाजता सुप्रसिध्द कीर्तनकार ह. भ. प. मकरंदबुवा किर्लोस्कर यांचे कीर्तन होणार आहे.
गुरूवार (दि. ९) सकाळी ७ वाजता श्री कृष्णाबाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता लळित कीर्तन, सायंकाळी ७ वाजता वसंतपूजा होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा