सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडीला देवदर्शनासाठी भक्तांना घेऊन निघालेली मारुती ओमनी व्हॅन सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथे रस्त्याकडेच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार तर, सहाजण जखमी झालेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास झाला. अपघातात पांडुरंग सिद्धराम देशमुख (५५, रा. सिद्धेश्वर कुरोली), मालन धनाजी राऊत (५५, रा. बनपुरी, ता. खटाव) आणि सुरेखा बबन शिंदे (६०, मुळगाव राणंद सध्या रा. दहिवडी, ता. माण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सुवर्णा संजय शिंदे (४५, रा. बनपुरी) यांचा वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सांगली: वन विभागाच्या परीक्षेत अंतर्वस्त्रात डिव्हाईसने नक्कल करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

बाळकाबाई तुकाराम देवकर (६०, रा. बनपुरी), कोमल तेजेंद्र जाधव (२८, रा. निसराळे), अमोल श्रीरंग बनसोडे (३०, रा. सिद्धेश्वर कुरोली), सुनंदा श्रीरंग बनसोडे (५०), कुंदा काशिनाथ देशमुख (५५) आणि अन्विक निलेश देशमुख (६ चौघेही रा. सिद्धेश्वर कुरोली) हे सहाजण जखमी झाले आहेत. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती व्हॅनतून सिद्धेश्वर कुरोली, बनपुरी व दहिवडी येथील दहाजण सांगली  जिल्ह्यातील लोकरेवाडीला देवदर्शनासाठी निघाले होते. कातरखटाव ते मायणी दरम्यान, असलेल्या सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मारुती ओमनी व्हॅन (एमएच ११, बीव्ही ७२४६) ही रस्त्याकडील झाडावर जाऊन जोराने धडकल्याने हा भीषण अपघात झाला. त्यातील जखमींवर वडूज व सातारा येथे उपचार सुरु आहेत. अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने हे करीत आहेत.