जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत मुंबई येथील दोन मुलांसह चार ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईहून शिर्डीकडे जाणारी तवेरा कार सकाळी दहाच्या सुमारास पांढुर्ली शिवारात आली. या वेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात प्रशांत राजा सुवर्णा (३२), रेखा प्रशांत सुवर्णा (२८) आणि शरण प्रशांत सुवर्णा (६) हे एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले. अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात देवनदीवरील पुलावर झाला. मुंबईहून शिर्डीकडे जाणारी इंडिका कार पहाटे देवनदीवरील पुलावर आली असता दुभाजकांवर जाऊन उलटली. या अपघातात अमन जितेंद्र यादव हा मुंबई येथील सहा वर्षांचा मुलगा
ठार झाला.

Story img Loader