पंढरपूर : वारकरी संप्रदायात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या माघी एकादशीला राज्यातून जवळपास चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. भाविकांनी एकादशीला पहाटे स्नान, नगरप्रदक्षिणा, देवाचे दर्शन घेतले. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना १२ ते १३ तास लागत होते. एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरास फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माघी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे चार लाख भाविक दाखल झाले. एकादशीला पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्यांनी केली. एकादशीनिमित्त पुण्यातील भाविक सचिन अण्णा चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी श्री विठ्ठल मंदिरात फुलांची आरास केली. या कामी झेंडू, शेवंती, जरबेरा आदी १ टन फुलांची आरास करण्यात आल्याची माहिती समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या फुलांच्या आराशीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून आले. मंदिरावर रोषणाईसुद्धा करण्यात आली.

एकादशीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून चंद्रभागा स्नान करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नगरप्रदक्षिणा करून देवाचे दर्शन घेतले. एकादशीनिमित्त म्हणजे आज, दुपारी साडेअकरा वाजता दर्शनरांग पत्राशेडपुढे पोचली होती. दर्शन रांगेतून देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी साधारणपणे १२ ते १३ तास वेळ लागत आहे. भाविक एसटी, रेल्वे, खासगी वाहनांतून पंढरीला आले. शहरातील धर्मशाळा, मठ, मंदिर परिसर गजबजून गेला. तीर्थक्षेत्र पोलीस या उपक्रमातून पोलिसांनी भाविकांना सुरक्षेबरोबर मदतदेखील केली. एकंदरीत टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाच्या जयजयकाराने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.

गर्दीच्या नियोजनाची गरज

दरम्यान आजच्या वारी वेळी शहरातील मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा, वाळवंट यांसारख्या ठिकाणी भाविकांची अतिगर्दी दिसून आली. यामध्ये चंद्रभागेत स्नान करण्यासाठी सर्वाधिक गर्दी होती. नगर प्रदक्षिणा, दर्शन या वेळी या गर्दीने टोक गाठले. प्रशासनाकडून गर्दीच्या नियोजनासाठी व्यवस्था केलेली असली तरी ती अनेक ठिकाणी कोलमडून गेलेली दिसली