नागपूर मध्यवर्ती कारागृहातून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र गुप्ता असे या आरोपीचे नाव आहे. आज पोलिसांनी जबलपूरमधून येथून सत्येंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता याला अटक केली. गुप्तावर तब्बल २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
बिसनसिंह रामुलाल उईके, मोहम्मद सुहेल उर्फ शिब्बू, सत्येंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, प्रेम उर्फ नेपाली शालीग्राम खत्री, आकाश उर्फ गोलू रज्जुसिंह ठाकूर या आरोपींनी ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट बंदोबस्त असतानाही तुरुंगातून पलायन केले होते .  या प्रकरणी आतापर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होते. आता या गुन्ह्याचा सूत्रधार सतेंद्र गुप्ता याला पोलिसांनी अटक केल्याने पाचव्या आरोपींचा शोध लागण्यास मदत होणार आहे.