लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: विट्याजवळ नेवरी रस्त्यावर गुरुवारी सकाळी खासगी प्रवासी बस आणि मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह चार जण ठार झाले. मुंबईतील मालाडचे काशीद कुटुंब तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे जत्रेसाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली.

सदानंद दोदोबा काशीद हे फोर्ड मोटारीतून (एमएच ४७ केजी ९५४) गव्हाण जत्रेसाठी मालाड येथून रात्री निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी, भाऊ, मेव्हणा आणि बदली चालक होते. विट्याजवळ शिवाजीनगर येथे आल्यानंतर समोरुन येणाऱ्या खासगी प्रवासी बसला (एआर ०१ जे ८४५२) धडक झाली.

हेही वाचा… ‘वाघ बघायला ताडोबात जा’, फिल्मफेअर सोहळ्यात अभिनेता सलमान खान व आयुष्यमान खुराणा यांनी सिनेसृष्टीतील कलावंतांना दिले ताडोबा सफारीचे निमंत्रण

या अपघातात मोटारीतील सुनिता काशीद (६१), चंद्रकांत काशीद (६२), चालक योगेश कदम (३५) आणि अशोक सुर्यवंशी हे चौघे जागीच ठार झाले. तर सदानंद काशीद हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Story img Loader