उन्हाळय़ाच्या दिवसातील कामे संपवून सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील सहा जणांचा मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. हे सर्व जण चेंबूरच्या घाटला गावात राहणारे छोटे बांधकाम व्यावसायिक होते. तर मृतांमध्ये शिवसेनेच्या एका उपशाखाप्रमुखाचाही समावेश आहे.
चेंबूरमधील घाटला गावातील १७ बांधकाम व्यावसायिकांचा चमू शनिवारी मुरुड येथे गेला. हे सर्वजण येथील पार्वती लॉजमध्ये मुक्कामाला होते. यापैकी सात जण रविवारी सकाळी समुद्रात पोहण्यासाठी गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात आतवर गेले व बुडाले. यामधील अनिल मोतीराम भालत हे कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले. मात्र, रोहित जाला, विनोद अजई, दिनेश पवार, दिलीप गोळे, संजय पांचाळ आणि शंकर चव्हाण यांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण ४०-४५ वयोगटातील आहेत. त्यांचे मृतदेह एकदरा येथील समुद्रकिनाऱ्यावरून बाहेर काढण्यात आले.

 प्रतिनिधी, अलिबाग

Story img Loader