गुहागर : महीन्द्रा थार या स्वत:च्या गाडीवर विधानसभा सदस्य असे स्टीकर लाऊन फिरणाऱ्या गावगुंडांना घेऊन गुहागर मधील खरे ढेरे महाविद्याल्यातील चार प्राध्यापकांना संस्थेच्याच चालक अध्यक्षाने लोखंडी सळी आणि काठीने जबरी मारहाण केली. या घटनेने चांगलीच खळखळ उडाली आहे.

गुहागर येथील खरे ढेरे महाविद्याल्याच्या संस्था चालक अध्यक्ष असलेल्या महेश भोसले याने रोहन भोसले गुंडा मार्फत त्याच्या इतर ७ साथीदारां सह महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना कट करुन लोखंडी सळी व लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. ही घटना १८ डिसेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता ही घटना घडली. मारहाण झालेल्या दोन प्राध्यापकांची प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर दोन प्राध्यापकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा…Vijay Wadettiwar : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

रोहन भोसले हा गुंड स्वतःला शिंदे गटाचा कार्यकर्ता व मंत्री उदय सामंत व आमदार भैय्या सामंत यांच्याशी जवळीक असलेल्याचे भासवून स्थानिक पातळीवर गुंडगिरी करीत अस्टॉ. आपल्या महिंद्रा थार या गाडीवर विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरत असतो. खरे ढेरे महाविद्यालयात बनावट परीक्षार्थी व बनावट गुणपत्रिका याबाबत मुंबई विद्यापीठामार्फत फॅक्ट चेकिंग नोटीस देण्यात आली, या रागातून संचालकांनी हल्ला केला असल्याचे मारहाण झालेल्या प्राध्यापकांनी फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सकाळी घडून देखिल हा गुन्हा नोंद व्हायला रात्री साडे अकरा वाजले तरी गुन्हा नोंद करून घ्यायला स्थानकातील पोलीस अधिकारी टाळाटाळ करीत होते व फिर्यादीनाच धमकावत असल्याबाबत धक्कादायक आरोप भुक्टोच्या प्राध्यापक संघटनांनी केली आहे. मात्र प्राध्यापक संघटना, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी रात्री पोलीस स्टेशन परिसर न सोडल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला. यामध्ये प्रा.गोविंद भास्कर सानप, प्रा. अनिल शशिकांत हिरगुंड, प्रा. निळकंठ सखाराम भालेराव, प्रा. संतोष विठ्ठलराव जाधव अशी हल्ला झालेल्या प्राध्यापकांची नावे आहेत.

हेही वाचा…Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, नेमकी मागणी काय?

सर्व गुन्हेगारांवरती जीवे मारहाण केल्याची केस दाखल झाली पाहिजे व गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिका-याची चौकशी अंती निलंबन झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. खरे ढेरे महाविद्यालयामधील संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊन तत्काळ सर्व आरोपीना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी गुहागर तहसीलदार कार्यालयावर प्राध्यापक पालक व विद्यार्थी यांचा मोर्चा काढण्यात येण्याबाबत निवेदन प्राध्यापक संघटनांनी गुहागर पोलीस स्थानक व तहसीलदार गुहागर यांना देण्यात आल आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेल नसून, सर्व आरोपी फरार आहेत अशी माहिती स्थानिक पोलीस स्थानकातून देण्यात आली आहे.

Story img Loader