औरंगाबादमध्ये धावत्या स्कूल बसमधून चार मुलं पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये चारही मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नगरनाका-लोखंडी पुलादरम्यान ही घटना घडली आहे. घटना घडली त्यावेळी स्कूल बसमध्ये जवळपास 100 मुलं होती अशी माहिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी स्कूल बसमधून नेलं जात होतं अशी माहिती आहे. मात्र, नगरनाका-लोखंडी पुलावर ही बस आली असता बसच्या मागील बाजूची काच फुटली आणि चार मुलं पडल्याचं समजतंय. चारही विद्यार्थ्यांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. छावणी परिसरातील शांताबाई विद्यालयाची ही बस असल्याचे समजते.