कृष्णा पांचाळ
गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचा संदेश घेऊन समुद्र सपाटी पासून ३ हजार फूट उंच लिंगाणा सुळका अवघ्या चार वर्षीय चिमुकलीने सर केला आहे. सह्याद्री महेश भुजबळ अस या चिमुकलीचे नाव असून तिने ही कामगिरी नुकतीच केली आहे. लिंगाणा हा सुळका चढाईसाठी अत्यंत अवघड आहे. तो पाहिल्यावरही अनेकांना धडकी भरते. असा अवघड आणि तितकाच आव्हानात्मक लिंगाणा सुळका सह्याद्री या चार वर्षांच्या मुलीने सर केल्याने तिचं कौतुक होतं आहे.
सह्याद्री ११ महिन्यांची होती तेव्हापासून तिला गड-किल्ले याबाबद्दल माहिती देत संवर्धन करण्याची शिकवण वडील महेश भुजबळ यांनी दिली. रायगड, सिंहगड, दिवेघाट येथील मल्हारगड, तुंग, प्रतापगड अशा १३ गडकिल्ल्यांची भटकंती सह्याद्रीने केली आहे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला असं तिचे वडील सांगतात.
गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण याचा संदेश देण्यासाठी तिने लिंगाणा सुळका सर करण्याचे ठरवले असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मुळाक्षरे गिरवण्याच्या वयात सह्याद्रीने लिंगाणा सुळका सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी खडतर परिश्रम घेत सागर नलावडे आणि वडील महेश भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगाणा सुळका सर करण्याची तयारी तिने केली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी सकाळी आठ च्या सुमारास रोपच्या साहाय्याने सुळका सर करण्यास सुरुवात केली. ट्रेकिंग करताना सुरक्षेची सगळी साधनं घेऊनच हे पाऊल उचलण्यात आलं होतं.
वडील महेश आणि सागर नलावडे यांनी रोपच्या मदतीने सह्याद्रीला लिंगाणा सुळका चढण्यास मदत केली. सुळक्याच्या मध्यभागी गेल्यानंतर दुपारच्या सुमारास तिने विश्रांती घेतली आणि पुन्हा चढाईला सुरुवात केली. संध्याकाळी चारच्या सुमारास लिंगाणा सुळका सह्याद्रीने सर केला. सुळका सर करताच सह्याद्रीमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. तिथे जाताच तिने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.
सह्याद्री असं नामकरण करण्याचा किस्सा
चिमुकल्या सह्याद्रीच्या नावाचाही किस्सा आहे. महेश यांना बहिणीच्या मुलीचं नामकरण सह्याद्री करायचं होतं. परंतु त्यांना दोन्ही मुलंच झाली. त्यामुळे महेश यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना पहिली मुलगी झाली तिचं नाव त्यांनी सह्याद्री ठेवलं.