सांगली : चार वर्षाच्या मुलीचा खून करुन पार्थिव पेटीत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी करजगी (ता.जत) येथे उघडकीस आला. संशयितांने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय असून वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्टता होणार आहे. या प्रकरणी संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पिडीत बालिका सकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबातील लोक तिचा शोध घेत होते. घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा संशय आल्याने घराची झडती घेतली असता पेटीमध्ये पोते दिसले. पोत्यावर डाग असल्याने उघडून पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच उमदी ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनीही धक्कादायक प्रकार समजताच घटनास्थळी गर्दी केली होती.

पोलीसांना मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जत रुग्णालयात पाठवला आहे. संशयितांने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र त्यांने हा खून कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास सुरु असून या घटनेची सायंकाळपर्यंत कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही.

Story img Loader