छत्रपती संभाजीनगर : ट्रकमधील लोखंडी प्लेटा अंगावर पडून चार तरुण मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री शिऊर बंगला जवळील टूनकी शिवारात घडली. सर्व मजुर हे मध्यप्रदेश राज्यातील धरमपुरा (ता. मनासा) येथील रहिवासी असून २० ते २२ वयोगटातील आहेत. दिवान मानसींग गरासिया, विजय कवरलाल गरासिया, निर्मल राजुजी गरासिया, विक्रम मदनजी कछावा, अशी मृतांची नांवे असल्याची माहिती शिऊर पोलीस ठाण्यातील हवालदार विजय बिल्ल यांनी दिली. कर्नाटकाहून राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये (आर.जे.०९ जी.डी ३८५३) बसून हे मजूर प्रवास करत होते. थकव्याने मजूर ट्रकच्या ट्रॉलीत झोपले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान चालकाने अचानक ब्रेक दाबताच ट्रॉलीतील लोखंडी प्लेट पुढे सरकली व झोपलेल्या मजुरांवर कोसळली. या अपघातात चौघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोकलेनच्या सहाय्याने मृतदेह वाहनातून बाहेर काढले. मृतदेहांचे शवविच्छेदन शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी करण्यात आले. या प्रकरणी अनिल पप्पुजी गरासीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक सुरेश गुर्जर विरूद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.