शहरात सुरू असलेल्या लष्कर भरतीत सहभागी झालेल्या लातूरमधील तरुणाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी नगरमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज, न्यायालयाने दिला.
अमोल अप्पासाहेब औटे (भूषणनगर, केडगाव) व संदीप केरू गर्जे (लाकडवाडी, पाथर्डी) या दोघांना अटक करण्यात आली. दोघांसह आबासाहेब सगट (बाभुळगाव, लातूर) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेब तान्हाजी गोरे (वय २०, रा. औसा, लातूर) याने तक्रार दिली आहे. सध्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लष्कर भरती सुरू आहे. गोरे याला भरतीमधील शारीरिक व लेखी परीक्षेत उत्तीर्ण करून देतो, असे आमिष तिघांनी दाखवले व त्यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी मूळ कागदपत्रे घेतली. नंतर गोरे याने कागदपत्रे परत मागितली तर तिघांनी त्यासाठी त्याच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा