तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात झालेले सर्व गरव्यवहार मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाले असल्याचे स्पष्टीकरण आमदार ओम राजेिनबाळकर यांनी दिले.
नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात तेरणा कारखान्यात गरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. परंतु या अहवालातील ११ प्रकरणांमध्ये दोष आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे आमदार राजेिनबाळकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर सादर केली.
नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालकांनी १४ जुल रोजी साखर आयुक्तांना अहवाल सादर करून तेरणा कारखान्यात गरव्यवहार झाल्याचे आरोप केले आहेत. या बाबत बोलताना आमदार राजेिनबाळकर म्हणाले की, मागील पाच वषार्ंत साखरेचे एकही पोते उधार दिले नाही. अहवालात नमूद केलेला बारदाण्याचा मुद्दा तेरणा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाकडील अॅडव्हान्स तसेच अर्कशाळा लिजवर देणे, मळी, बगॅस व साखर विक्री याच्या दरातील फरक हे सर्व प्रकार कारखान्याची सत्ता आमच्याकडे येण्यापूर्वीचे असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी अहवालात नमूद केलेले सर्व मुद्दे खोडून काढत पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण अद्याप झाले नसल्यामुळेच आमच्या काळातील लेखा परीक्षणास अडथळे येत असल्याचे सांगितले. तसेच प्रादेशिक सहसंचालकांनी सादर केलेला हा अहवाल दिशाभूल करणारा आहे.
तेरणा कारखान्याच्या अनुषंगाने समोरासमोर चर्चा करण्यासाठी आपण कधीही तयार आहोत. मात्र अगोदर प्रश्न द्या, त्याची उत्तरे देऊ असे विरोधक म्हणतात. असे प्रश्न लिहून दिले तर चच्रेला अर्थ राहणार नाही. सहसंचालकांनी दिलेल्या अहवालात विद्यमान संचालक मंडळात दोष निर्माण झाल्याचे म्हटले आहे. यावर राजेिनबाळकर यांनी संचालक कारखाना अध्यक्षांकडे राजीनामे देत असतात. हे राजीनामे मंजूर नसताना अहवालात संचालक कार्यरत असल्याचे सांगणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले.
दरम्यान, तेरणा कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी या प्रकरणी प्रादेशिक सहसंचालकांनी सादर केलेल्या अहवालातील मुद्दे गंभीर आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सगळ्याच बाबी मागील संचालक मंडळावर ढकलून जबाबदारी टाळता येणार नाही. लेखापरीक्षणासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. मग लेखापरीक्षण का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘तेरणा’तील गैरव्यवहार मागील कालावधीतील; आमदार ओम राजेनिंबाळकर यांचे स्पष्टीकरण
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात झालेले सर्व गरव्यवहार मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाले असल्याचे स्पष्टीकरण आमदार ओम राजेिनबाळकर यांनी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-07-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in terna is past mla om rajenimbalkar