सांगली : दहा महिन्यात पैसे दामदुप्पट देतो असे सांगून निहारिका फायनान्सियल सर्व्हिसेस मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ९४ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना आटपाडी येथे घडली असून या प्रकरणी कंपनीच्या सात जणाविरूध्द आटपाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आटपाडी येथील कॉलेज रोडवर निहारिका फायनान्सियल सर्व्हिसेस या नावाने गुंतवणूक कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कंपनीकडून दहा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यात आले. या योजनेवर विश्‍वास ठेवून रामजी चंद्रकांत होनमाने (रा. मंगळवेढा) यांनी ७७ लाख ५८ हजार ९०० रूपयांची गुंतवणूक केली. सुरूवातीच्या काळात कंपनीकडून १५ लाख ४० हजाराचा परतावाही देण्यात आला. यामुळे अन्य गुंतवणूक दारांचा विश्‍वास संपादन केला. यामुळे संतोष गुजले यांनी १८ लाख ९० हजार, प्रविण बनसोडे यांनी ८ लाख ५० हजार आणि यशवंत मेटकरी यांनी ५ लाख अशी एकूण ९४ लाख ५९ हजार ५७०रूपये गुंतविले आहेत. वारंवार मागणी करूनही मूळ रक्कम आणि हमीप्रमाणे परतावा दिला नाही म्हणून फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.

आणखी वाचा-इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे

या तक्रारीनुसार संतोष व निकिता आडसुळ या पतीपत्नीसह राहूल चव्हाण, विनायक माळी, सुधीर आडसुळ, अनिल आडसुळ आणि मल्हारी आडसुळ अशा सात जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.