सांगली : शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवनू सुमारे एक कोटींची फसवणूक करण्यात आल्याच्या दोन स्वतंत्र घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. फसवणूक झालेल्यामध्ये एका वकिल महिलेचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरज शहर पोलीस ठाण्यात आरती होसपुरे यांनी कुलदीप काशीद व त्यांची पत्नी स्मिता काशीद या दोघांविरूद्ध ४३ लाख ८८ हजाराची फसवणुक केल्याची तक्रार दाखल केली आहे. काशीद यांनी के. के. कन्सलटन्सी स्टॉक मार्केट रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालॅसिस या नावाची कंपनी काढून गुंतवणूक दारांना मासिक ७ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. यामुळे गुंतवणूक दारांनी ५७ लाख ५० हजाराची गुंतवणूक केली. यापैकी परतावा म्हणून १३ लाख ६१ हजार रूपये परत मिळाले असले तरी उर्वरित रक्कम परत केली नाही म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणखी वाचा-सांगली बाजारात हळदीला ३१ हजाराचा उच्चांकी दर

तर जतमध्ये सचिन ऐनापुरे यांनी कुणाल सिंग याच्याविरूद्ध ५० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. कुणालसिंग यांने डिर्मट खाते काढून ट्रेडिंग करून फायदा मिळवून देतो असे सांगून रक्कम उचलली. मात्र, नफा तर मिळालाच नाही, उलट गुंतवणूकीची रक्कमही बुडित गेली आणि कुणालसिंग यांने ट्रेडिंग केल्याबद्दल कमिशनपोटी सुमारे आठ लाख रूपये घेतले असे तक्रारीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of one crore rupees with the lure of higher returns mrj