सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. वेगवेगळे मेसेज आणि लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यात अशिक्षित नागरिकांचाच समावेश नाही, तर अगदी सुशिक्षित, उच्चशिक्षित नागरिकांनाही गंडा घातला जात आहे. असाच एक प्रकार जालन्यात उघड झालाय. सायबर गुन्हेगारांनी एका महिला प्राध्यपिकेची ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या नावाखाली २ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

देशभरात डिजीटल इंडियाची चर्चा सुरू असताना मोबाईल रिचार्जपासून अगदी वीज बिल भरण्यापर्यंत अनेक कामं आता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून होत आहेत. मात्र, हे करताना योग्य खबरदारी न बाळगल्यास मोठ्या फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. असाच प्रकार वीज बिल भरणा करताना घडल्याचं उघडकीस आलं आहे. यात वीज बिल भरण्यासाठी ॲप डाऊनलोड करताच खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले गेल्याचा प्रकार घडलाय.

हेही वाचा : पिंपरी : इंटरनेटचा गैरवापर करून महिलेची १० लाखांची फसवणूक

याविषयी सायबर सेलकडून नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जालन्यातील बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी अशा ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवाहन केले आहे.

Story img Loader