बुलढाण्यामध्ये एका विचित्र घटनेत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसच्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत. मलकापूर-पिंपळगाव मार्गावरील एसटी बसचा तुटलेला पत्रा लागल्याने दोन तरुणांचे हात कापले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बस चालकच्या आसनाच्या मागील रांगेमधील पत्रा तुटल्याने तो बाहेर आला होता. ही बस मलकापूरवरुन पिंपळगावला जाणाऱ्या मार्गावर असतानाच पोलीस प्रवेश परीक्षेसाठी सराव करणारे काही तरुण मॉर्निंग वॉकला जाताना हाताचे व्यायम करत रस्त्याच्या बाजूने संथ गतीने धावत होते. त्याचवेळी ही बस बाजूने गेली आणि दोन तरुण गंभीर जखमी झाले. या तरुणांपैकी एकाचा हात अगदी तुटून खाली पडल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
no action against officer found guilty in cow distribution scam
बहुचर्चित गायवाटप घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई नाहीच; लाभार्थी, कर्मचाऱ्यांचे पुन्हा जबाब…
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
indefinite satyagraha protest in front of palghar collectorate
श्रमजीवी सत्याग्रहातील कोंडी फुटेना; सुमारे आठ हजार नागरिकांचा सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
labor suicide contractor torture
ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराची चाकूने गळा चिरून आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदार अटकेत
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
Fraud with Blind couple, baby adoption,
अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक ! प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या

या विचित्र अपघानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र बस चालकाने प्रसंगावधान दाखवत दोन्ही जखमी तरुणांना मलकापूर रुग्णालयामध्ये उपाचरांसाठी दाखल केलं. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यानंतर बस चालकाने ही बस मलकापूर पोलीस स्थानकामध्ये नेली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस घटनास्थळी पोहचले असून प्रकरणाचा पंचनामा सुरु आहे. दरम्यान या तरुणांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जळगावमधील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.