सतीश कामत

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्याशी मैत्री, तर माजी मंत्री असलेले सख्खे भाऊ रामदास कदम यांच्याशी वाद, या दोन्हीमुळे सदानंद कदम ईडीच्या कचाटय़ात सापडले आहेत.

Nanaji Deshmukh Panchayat Samiti tops state for Tiroda Panchayat Samiti Sustainable Development Award 2024
नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Loksatta sanvidhanbhan Historical background of Jammu and Kashmir
संविधानभान: जम्मूकाश्मीरची ऐतिहासिक पार्श्वभूमी
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील
grandparent educational group formed by Prashant Bhoyer training grandparents and grandchildren together in school
आजी आजोबांसोबत शिक्षण: युवा शिक्षकाचा अफलातून प्रयोग

या संदर्भात थोडा इतिहास पाहिला तर १९९० पूर्वी रामदास कदम आणि सदानंद ऊर्फ आप्पा कदम या सख्ख्या भावांचे एकत्र कुटुंब मुंबईला कांदिवली भागात राहत होते. रामदासभाई शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून राजकीय बस्तान बसवत असताना सदानंद राजकारणापासून दूर राहून टेंपोद्वारे मालवाहतुकीचा व्यवसाय करत होते. १९९३-९४ मध्ये मुंबईत केबलचा व्यवसाय जोरात सुरू झाल्यानंतर सदानंद कदम साई केबलह्णच्या माध्यमातून त्या व्यवसायात शिरले. १९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर रामदास कदम मंत्री झाले. त्याचाही त्यांना या व्यवसायातील वॉरह्ण मिटवून जम बसवण्यासाठी उपयोग झाला. याच काळात अनिल परब यांच्याशी त्यांची सलगी वाढू लागली. पण पुढे, २००३-०४ मध्ये खेड एसटी स्टँडच्या बाजूला सदानंद कदमांनी अनिकेत शॉपिंग सेंटर हे भव्य, तीन मजली व्यवसाय केंद्र सुरू केलं. याच सुमारास सख्खा भाऊ असलेल्या रामदासभाईंशी काही कारणांनी खटके उडू लागले आणि दोन भावांमधलं अंतर वाढत गेलं.

शॉपिंग सेंटरपाठोपाठ भरणे नाका येथील आमराई मोटेलह्ण हे हॉटेल सदानंद कदमांनी विकत घेऊन मोठं रिसॉर्ट बांधलं. अशा प्रकारे खेड परिसरातील मोक्याच्या जागांच्या खरेदी-विक्री व्यवहारात जम बसवत असताना येथील ५-६ प्रमुख व्यावसायिक सदानंद कदम यांचे भागीदार बनले. पण काळाच्या ओघात यापैकी बहुतेकांशी त्यांचं वितुष्ट आलं. अगदी कोर्ट-कचेऱ्या झाल्या.शॉपिंग सेंटरची वाटणी झाली. मात्र अनिल परब यांच्याशी सख्य आणि व्यावसायिक संबंध कायम राहिले. यातूनच सध्याच्या वादग्रस्त साई रिसॉर्टचा व्यवहार झाला. पण पुढे हा विषय अडचणीचा होऊ लागल्यावर परबांनी, गेल्या सुमारे पंचवीस वर्षांचे व्यावसायिक मित्र सदानंद कदम यांच्या गळय़ात तो घातला आणि तेच आज त्यांच्यासाठी त्रासदायक ठरले आहे. या संदर्भात आणखी बाब म्हणजे, हा विषय चव्हाटय़ावर येण्यासाठी भाजपचे  माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबरोबरच स्थानिक वाळू व्यावसायिकांशी सदानंद कदमांचा वाद त्रासदायक ठरला.

एकीकडे या सगळय़ा व्यावसायिक गोष्टी सुरू असताना रामदासभाईंशी असलेलं वितुष्ट सदानंद कदम यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने संपुष्टात आलं होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये येणं-जाणं सुरू झालं होतं. इतकं की, भरणे नाक्यावरच्या रिसॉर्टमध्ये सदानंद कदम यांनी सुरू केलेल्या क्लब हाऊसच्या उद्घाटनप्रसंगी रामदासभाईंचे आमदार झालेले चिरंजीव योगेश हेही उपस्थित होते. पण नंतर अनिल परब यांच्या संदर्भात रामदास कदम यांच्या तथाकथित चित्रफिती प्रसारित झाल्या. त्यामागे अन्य काही राजकीय विरोधकांसह सदानंद कदम यांचाही हात असल्याचा संशयातून या दोन भावांमध्ये पुन्हा इतकं वितुष्ट निर्माण झालं की, आता त्यांच्यातून विस्तवही जात नाही.

त्यामुळेच कदम पिता-पुत्रांचे तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले  माजी आमदार संजय कदम यांनी गेल्या आठवडय़ात उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला त्या कार्यक्रमाला सदानंद कदम यांनी भरपूर रसदह्ण पुरवल्याचा आरोप आहे आणि म्हणून तो झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसात त्यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावं लागलं, अशी सार्वत्रिक चर्चा आहे.

Story img Loader