महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. विविध राजकीय, सामाजिक आणि महिला विषयक प्रश्नांवर त्या भाष्य करत असतात. त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे अनेकदा त्या ट्रोलही झाल्या आहेत. आज फ्रेंडशिप डेचं औचित्य साधून त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संबंधित ट्वीटमध्ये त्यांनी “ये दोस्ती हम नही तोड़ेंगे” असं म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी “महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत” असंही म्हटलं आहे. त्याचं हे ट्वीट आता वेगानं व्हायरल होतं आहे. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं असून #FriendshipDay2022 हा हॅशटॅग वापरला आहे.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असे वाटतं का? अमृता फडणवीस म्हणाल्या, “नरेंद्र मोदींशिवाय…”

अमृता फडणवीस यांच्या ट्वीटनंतर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. पहाटेचा शपथविधी यशस्वी ठरला असता तर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार तुमच्यासाठी महाराष्ट्राचे अनमोल रत्न ठरले असते का? असा खोचक सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे.