सांगली : सांगलीच्या जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत कॉंग्रेस व शिवसेनेत टोकाला पोहोचलेला वाद निवळण्याची चिन्हे शुक्रवारी दिसून आली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भेट घेऊन निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – रायगड रोपवे ला चौथी ट्रॉली

हेही वाचा – शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”

आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर सावंत आणि राऊत यांची झालेली भेट महत्वपूर्ण ठरणारी आहे. दरम्यान, मविआतील उबाठा शिवसेनेचे चंद्रहार पाटील आज उमेदवारी दाखल करत आहेत. यावेळी शक्तिप्रदर्शन करत मारुती चौकामध्ये जाहीर सभा होत आहे‌. यासाठी मविआमधील सर्व प्रमुख नेते निमंत्रित करण्यात आले आहेत. आमदार सावंत यांच्याबरोबर आमदार जयंत पाटील यांनीही खासदार राऊत यांची भेट घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship of congress uddhav balasaheb thackeray shivsena in sangli ssb
Show comments