सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वायंगणी येथील जमीन खरेदी करण्यास आलेल्या दिल्लीतील व्यक्तीला त्याच्याच सहकारी आणि मुंबईतील एका इस्टेट एजंटने सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार मालण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मे २००६ ते २०११ या कालावधीत फिर्यादी विक्रमादित्य योगेश चंद्रा आणि त्यांचा सहकारी संजय दत्त यांनी भागीदारीत वायंगणीतील जमीन खरेदी करण्याचे ठरविले. त्यासाठी पुरोहीत या एजंटची मदत घेण्यात आली. जमीन खरेदीसाठी चंद्रा यांनी संजय व द्वारकाधीश पुरोहित यांच्याजवळ रक्कम दिली.मात्र जमिनीच्या कागदपत्रांवर या दोघांनी स्वतची नावे घालून चंद्रा यांची फसवणूक केली.
सिंधुदुर्गात जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक

First published on: 08-01-2013 at 04:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frod in land buying buisness in sindhudurga