अलिबाग : अमेरिकेतील ग्राहकांना प्रतिबंधित कामोत्तेजक गोळ्या विकण्याच्या बहाण्याने फसवणूकीसाठी इंटरनेट कॉलिंग अँपचा वापर केला जात होता. संगणक आणि मोबाईल मधून या अँपच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जात होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरीकेत व्हियाग्रा, सियालीस, लिवीट्रो या प्रतिबंधीत कामोत्तेजक गोळ्यांच्या वितरणासाठी यु एस फार्मा या अमेरीकन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून तेथील नागरीकांना अलिबाग येथून संपर्क साधला जात होता. घरपोच गोळ्या वितरण करण्याचे अमिष या माध्यमातून दाखवले जात होते. जॉन या नावाचा वापर करून ग्राहकांशी संवाद साधला जात होता. यासाठी दोन विशिष्ट मोबाईल आणि इंटरनेट कॉलिंग अँपचा वापर केला जात होता. यात दोन विशिष्ट इंटरनेट कॉलिंग अँप विकसित केली होती.

हे ही वाचा…Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”

ज्या अँपच्या माध्यमातून कुठल्याही देशातील नागरीकांशी त्यांच्याच देशातील नंबर मिळवून संवाद साधला जात होता. संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी फार्मा कंपन्यांच्या युट्यूब वरील चित्रफीतींची मदत घेतली जात होती. त्यामाध्यमातून कॉल सेंटर मध्ये कामाला असलेल्या मुलांना प्रशिक्षीत केले जात होते. ही मुले ग्राहकांशी अमेरीकन एसेंट मध्ये लिलया संवाद साधत होती. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसत असे, आणि त्यांची फसवणूक करणे सहज शक्य होत असे. गिफ्ट कार्डच्या माध्यमातून पैसे पाठविण्यास भाग पाडले जात असे.

प्रतिबंधीत गोळ्यांची मागणी केली असल्याने, झालेल्या फसवणूकीबाबत अमेरीकेत ग्राहक तक्रारी करून शकत नव्हते. प्रतिबंधीत गोळ्यांची मागणी केली म्हणून तेच कायदेशीर कारवाईत अडकण्याची शक्यता होती. त्यामुळे गोष्टीचा गैरफायदा कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक सुरू होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

हे ही वाचा…NCP vs Tanaji Sawant: ‘आता सत्तेतून बाहेर पडलेलं बरं’, विधानसभेआधीच महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाचा इशारा

या गुन्ह्यात जप्त केलेल्या मोबाईल आणि संगणकांच्या तांत्रिक पृथकरणाचे काम सुरु आहे. त्यातून या गुन्ह्यातील अनेक पैलू आणि महत्वपूर्ण माहिती समोर येऊ शकेल.अशी माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From alibaug internet calling apps were used to cheat us consumers with fake sales of banned aphrodisiac pills sud 02