सांगली : औदुंबर (ता. पलुस ) येथील दत्त जयंती उत्सव सोमवार ( दि. २५ ) पासुन सुरू होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाने केले आहे. यात सोमवार दिनांक २५ रोजी रोजी एक दिवसीय श्री गुरू चरित्र पारायण सोहळा सकाळी ६ ते दुपारी ४.३० पर्यंत होणार आहे. यात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र अंकलखोप व पलुस तालुक्यातील केंद्रातील साधक सहभागी होणार आहेत.
हेही वाचा… Maharashtra News Live : सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ
मंगळवार दि. २६ रोजी दत्त जयंतीचा मुख्य दिवस आहे. पहाठे ५ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरूवात होत असुन यामध्ये काकड व मंगल आरती, अभिषेक, दुपारी १२ ते १ पर्यत महापुजा, नैवद्य, व महाआरती, महाप्रसाद, दुपारी ४ ते ५.३० वा. श्री दत्तगुरूंच्या जन्माचे वासुदेव जोशी यांचे किर्तन होईल. सांयकाळी ५.३० वाजता श्री दत्तगुरूचा जन्म काळ सोहळा सुरू होईल. सांयकाळी श्री स्वामी समर्थ भजनसंध्या आणि रात्री धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली, करूणा त्रिपादी होणार आहे. तसेच बुधवार व गुरूवारीही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी सद्गुरू संगीत मंडळ, कंदलगाव यांच्या सोंगी भजनाने दत्त जयंती उत्सवाची सांगता होणार आहे.