कर्नाटक पोलिसांकडून येळ्ळुर येथील मराठी भाषिक जनतेवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी गुरुवार दि. ३१ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बठकीत घेण्यात आला. शासनाला जाग आणण्यासाठी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
समितीचे जिल्हाध्यक्ष बिराज साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार भवन येथे सर्वपक्षीय बठक झाली. या बैठकीस भाजप, शिवसेना, रिपाइं, कम्युनिस्ट, जनता दल, दोन्ही काँग्रेसचे कार्यकत्रे उपस्थित होते. ३१ जुलै रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

Story img Loader