‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे विद्यार्थी सोमवारी दुपारी जंतरमंतर मैदानापासून संसदेपर्यंत निषेध मोर्चा काढणार आहेत. शनिवारी विद्यार्थ्यांनी माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड यांना पत्र पाठवले आहे. हे सहावे पत्र असून या पत्रांची उत्तरे अद्याप न मिळाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या पत्रात आपण राठोड यांना संस्थेस भेट देण्याची विनंती केली असल्याचे विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
एफटीआयआय सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि इतर पाच सदस्यांना विद्यार्थ्यांचा विरोध असून आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपाचा रविवारी ५२ वा दिवस होता. दिल्लीतील शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांसह इतरही ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोच्र्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केल्याचेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

Story img Loader