सांगली : महापालिकेच्या घनकचर्‍यापासून जानेवारीपर्यंत इंधन वायू निर्मिती करण्यात येणार असून घनकचरा यापुढील काळात महापालिकेसाठी धनकचरा ठरेल असा आशावाद आयुक्त सुनील पवार यांनी सोमवारी व्यक्त केला.

महापालिकेची  प्रशासकीय सभा सोमवारी बेडग येथील कचरा डेपोवर प्रशासक  तथा आयुक्त पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहूल रोकडे, स्मृती पाटील, वैभव साबळे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Anti-Corruption Bureau arrests bribe-taking Deputy Director of Agriculture Commissionerate
पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले
Shiv Sena Thackeray group Nashik municipal elections
नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?

हेही वाचा >>> मालगाडीवर केलेल्या दगडफेकीत चालक जखमी

महानगरपालिकेने संकलित केलेला सुमारे साडेनउ टन कचरा बेडग रस्ता आ णि समडोळी येथील डेपोवर जमा होता. आयुक्त सुनील पवार यांनी वर्षानुवर्षे कचर्‍याचा आणि कचरा डेपो मध्ये गेल्या ४० वर्षापासून प्रलंबित असलेल्या कचर्‍याचा प्रश्न निकाली काढला. कचरा डेपो मधील कचर्‍यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केल्याने आज  बेडग रोडवरील कचरा डेपोचे रुपडेच पालटले आहे.

हेही वाचा >>> महिलांनी तोकडे कपडे घालणे अश्लीलता नाही, उच्च न्यायालय असे का म्हणाले?

घनकचरा प्रकल्पा अंतर्गत समडोळी रोड व मिरज- बेडग रस्त्यावरील कचरा डेपोमधील  जुन्या साठलेल्या कचर्‍यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. या निविदेमध्ये दोन्ही डेपोमधील जुन्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याकामी पुण्यातील  कृष्णा ग्रीन एनव्हायरीन सोल्युशन या कंपनीची  नियुक्ती केली. एकूण एकूण ५६ एकरवर हा कचरा डेपो असून यातील १४ एकरवर कचर्‍यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या प्रकल्पामध्ये कचर्‍यावर प्रक्रिया करून खत तयार करण्यात येत असून ते शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. तसेच नजीकच्या काळात कचर्‍यापासून सीएनजी इंधन वायू तयार करण्याचा प्रस्ताव असून हा प्रकल्प जानेवारीपर्यंत कार्यान्वित करण्याची योजना आहे. यापासून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.

Story img Loader