सांगली : महापालिकेच्या घनकचर्यापासून जानेवारीपर्यंत इंधन वायू निर्मिती करण्यात येणार असून घनकचरा यापुढील काळात महापालिकेसाठी धनकचरा ठरेल असा आशावाद आयुक्त सुनील पवार यांनी सोमवारी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महापालिकेची प्रशासकीय सभा सोमवारी बेडग येथील कचरा डेपोवर प्रशासक तथा आयुक्त पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहूल रोकडे, स्मृती पाटील, वैभव साबळे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>> मालगाडीवर केलेल्या दगडफेकीत चालक जखमी
महानगरपालिकेने संकलित केलेला सुमारे साडेनउ टन कचरा बेडग रस्ता आ णि समडोळी येथील डेपोवर जमा होता. आयुक्त सुनील पवार यांनी वर्षानुवर्षे कचर्याचा आणि कचरा डेपो मध्ये गेल्या ४० वर्षापासून प्रलंबित असलेल्या कचर्याचा प्रश्न निकाली काढला. कचरा डेपो मधील कचर्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केल्याने आज बेडग रोडवरील कचरा डेपोचे रुपडेच पालटले आहे.
हेही वाचा >>> महिलांनी तोकडे कपडे घालणे अश्लीलता नाही, उच्च न्यायालय असे का म्हणाले?
घनकचरा प्रकल्पा अंतर्गत समडोळी रोड व मिरज- बेडग रस्त्यावरील कचरा डेपोमधील जुन्या साठलेल्या कचर्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. या निविदेमध्ये दोन्ही डेपोमधील जुन्या कचर्यावर प्रक्रिया करण्याकामी पुण्यातील कृष्णा ग्रीन एनव्हायरीन सोल्युशन या कंपनीची नियुक्ती केली. एकूण एकूण ५६ एकरवर हा कचरा डेपो असून यातील १४ एकरवर कचर्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या प्रकल्पामध्ये कचर्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्यात येत असून ते शेतकर्यांना देण्यात येत आहे. तसेच नजीकच्या काळात कचर्यापासून सीएनजी इंधन वायू तयार करण्याचा प्रस्ताव असून हा प्रकल्प जानेवारीपर्यंत कार्यान्वित करण्याची योजना आहे. यापासून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.