Fuel Price In Maharashtra Today, 1 November : दिवाळी या सणाची कालपासून सुरुवात झाली. आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. तसेच आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिला दिवस सुद्धा आहे. त्यामुळे आज इंधनाचे नवे दर (Fuel Price In Maharashtra) सुद्धा जाहीर झाले आहेत. आजचे नवीन दर पाहता आज महाराष्ट्रातील इंधनाचा दर वाढला आहे. तर तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर काय आहे हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel Price In Maharashtra Today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७७९१.२८
अकोला१०४.१२९०.६८
अमरावती१०५.०६९१.५९
औरंगाबाद१०५.००९१.५०
भंडारा१०५.०८९१.६१
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०४.२४९०.८०
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.०६९०.५०
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.३३९१.८४
हिंगोली१०५.५८९२.०८
जळगाव१०५.१३९१.६३
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.२७९०.८२
लातूर१०५.९१९२.३९
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.६२९३.०८
नंदुरबार१०५.४२९१.९२
नाशिक१०४.२०९०.७२
उस्मानाबाद१०४.८५९१.३८
पालघर१०४.८६९१.३३
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.८३९०.३७
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.९३९२.४२
सांगली१०४.६९९१.२२
सातारा१०४.५४९१.०५
सिंधुदुर्ग१०५.४७९१.३७
सोलापूर१०४.५६९१.०९
ठाणे१०३.६६९०.१८
वर्धा१०४.८९९१.४२
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.८२९२.३२

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. त्यानंतर हे दर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. आज महिन्याचा पहिला दिवस म्हंटल्यावर आपण सगळेच घरखर्च व इतर गोष्टींसाठी पैसे बाजूला ठेवून देतो. अशातच जर इंधनाचे दर (Fuel Price In Maharashtra) वाढले तर सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका सुद्धा बसू शकतो.

हेही वाचा…Diwali Discount On Aprilia Bike : झिरो डाउन पेमेंट, तीन वर्षांची वॉरंटी आणि बरंच काही… दिवाळीत ही खास बाईक खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी

मोबाईलद्वारे जाणून घ्या पेट्रोल व डिझेलचा भाव :

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

दिवाळीच्या दिवसांत सुरक्षित प्रवास करण्यासाठी टिप्स :

१. फटाका जरी दूर फुटला तरी त्याच्या ठिणग्या गाडीच्या खिडक्यांतून आत शिरू शकतात. त्यामुळे प्रवास करताना गाडीच्या खिडक्या बंद ठेवा.

२. फटाके फुटत असलेल्या ठिकाणी एसी बंद ठेवा. कारमध्ये धूर अडवणारे फिल्टर्सचा उपयोग करा. केबिनमध्ये हा धूर जाऊ देत नाहीत. तरीदेखील सावधगिरी म्हणून अशा परिस्थिती कारचा एसी बंद ठेवणेच योग्य ठरेल.

३. फटका पेटताना दिसल्यास गाडी लगेच थांबवा आणि तो फुटल्यानंतरच पुढे न्या.