सांंगली : मालमोटारीसाठी १३ एकर जागेवर सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार असून यासाठीचा तातडीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी बुधवारी दिली.जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी महापालिकेचे आयुक्त गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते.

वखार भाग परिसरातील मालमोटारीसाठी वाहनतळ आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन गेली पंचवीस वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे. हा वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव तातडीने देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेने येत्या दहा दिवसांत सुधारित प्रकल्प पाठविल्यास शासन मंजुरी मिळू शकेल, असे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले. आयुक्तांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन दिले. नव्याने उभारण्यात येत असलेल्या वाहनतळावर सुमारे पाचशे मोटारींची व्यवस्था, स्वच्छतागृह, चालकांसाठी निवारागृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असेही श्री. गुप्ता यांनी सांगितले.यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी, विशेष निमंत्रित जयंत सावंत, विद्यमान अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, उपाध्यक्ष महेश पाटील, भाग्येश शहा, प्रितेश कोठारी, नागेश म्हारगुडे, रोहित सावळे, शंकर यादव उपस्थित होते.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Important update regarding Raigad Fort Project to build Shiv Srushti at Pachad gains momentum
रायगड किल्ल्या संदर्भात महत्त्वाची अपडेट… पाचाड येथील शिवसृष्टी उभारणीच्या प्रकल्पाला गती
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi cinema Paithani web series Gajendra Ahire entertainment news
सकस चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत…; दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे मत

हेही वाचा >>>शासकीय अधिकाऱ्यासह पोलिसाला अज्ञात भामट्यांकडून लाखोंचा गंडा

यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष श्री. कदम यांनी मिरजेतील रेंगाळलेल्या ड्रेनेजचा प्रश्न उपस्थित केला. मिरजेतील प्रकल्पासाठी निधीची कमतरता आहे. वाढीव २४ कोटी रुपयांची गरज असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. तसेच यावेळी आमदार विनय कोेरे यांच्या प्रस्तावानुसार कुपवाडमध्ये उभारण्यात येत असलेल्या अनुभवमंडप सभागृहाबद्दल आयुक्तांचे खास अभिनंदन लिंगायत समाजाच्यावतीने करण्यात आले. या सभागृहासाठी अडीच कोटींचा विशेष निधी महापालिकेस प्राप्त झाला असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. महादेव कुरणे उपस्थित होते.

Story img Loader