अर्थ खात्याची सूत्रे हाती येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षांव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करीत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न अजितदादांनी केल्याचे दिसते. यावरून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्षे काम केलं आहे, त्यामुळे मला याचं कौतुक आहे. पुरवण्या मागण्या ४६ हजार कोटीपर्यंत गेल्या. खरंच, हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार (मागण्या मान्य) करू शकते. मागेल त्याला पाहिजे त्याला निधी मिळतंय याचं कौतुक आहे. लोक प्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला तर थोडीशी खुशी राहणारच ना, असं जयंत पाटील म्हणाले.

दोन दिवसांत ठरणार विरोधी पक्षनेता

विरोधी पक्षनेतेपदी कोणाला निवडायचं हे ज्यांचा पक्ष मोठा आहे ते ठरवतील. मोठ्या पक्षाकडून विधानसभेच्या अध्यक्षांना कळवली जाईल. काँग्रेसकडून ही निवड कळवली जाईल आणि आज किंवा उद्या या दोन दिवसांत निवड होईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा >> अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवारांकडून खास तरतूद

‘राष्ट्रवादी’च्या आमदारांवर निधीवर्षांव

  गेल्या आठवडय़ात खातेवाटप होताच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडात साथ देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर केला. त्यासाठी आमदारांकडून कामांची यादी मागविण्यात आली होती. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातूनच राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funding for ncp mlas jayant patil said as the finance minister of the state sgk