नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली. चौकशीसाठी या दोघांनाही गडचिरोली पोलिसांना कधीही ताब्यात घेता येणार आहे.

प्रा. वरवरा राव यांच्यासह नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग यांना गतवर्षी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून दोघे पुणे पोलिसांच्या ताब्यातच होते. गडचिरोली जिल्ह्यात २०१६ मध्ये सूरजगड डोंगरावर माओवाद्यांनी ८० वाहने जाळली होती. यामध्ये जहाल माओवादी नेता नर्मदक्कासह मृत कमांडर साईनाथचाही सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणात वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेची चौकशी सुरू होती.

badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
bombay high court orders to stand with dont drink and drive banner at traffic junction
सिग्नलवर ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन उभा राहा ; उच्च न्यायालयाची आगळी शिक्षा
Shantinagar motorcycle thief , Bhiwandi , Tadi ,
ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी

पोलिसांना सापडलेल्या काही हार्ड डिस्कसह कागदपत्रांवरून गडचिरोली पोलिसांनी सूरजगडच्या जाळपोळ प्रकरणात प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. ३१ जानेवारीला गडचिरोली पोलिसांनी या दोघांना पुणे कारागृहातून ताब्यात घेतले होते. या दोघांना अहेरीच्या न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले.  न्यायालयाच्या आदेशानंतर या दोघांना पुन्हा पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

 

 

Story img Loader