गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एटापल्लीजवळ बुधवारी सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. एटापल्लीपासून पाच किमी अंतरावरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. सकाळच्या वेळेस निघालेल्या या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मृतांमधील सहा जण हे विद्यार्थी असल्याचे समजते. जखमींना एटापल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ज्या ट्रकने बसला धडक दिली तो ट्रक एका खाणकंपनीचा होता. या अपघातानंतर संतप्त जमावाने या मार्गावरील दोन ते तीन ट्रक पेटवून दिल्याचे वृत्त आहे.

mumbai best bus accident
Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी परिसरात बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Best Bus accident, Inquiry committee BEST,
Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तातडीची मदत, बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समिती स्थापन
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
Best Bus Accident
Best Bus Accident : “सुरुवातीला बेस्ट बसने तीन रिक्षा आणि काही लोकांना उडवलं आणि…”; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Story img Loader