गडचिरोली : नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देशविरोधी लढाई आहे. परकीय शक्ती आणि ‘आयएसआय’सारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्यांची ती लढाई आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र दिनी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी दामरंचा आणि ग्यारापत्ती या अतिसंवेदनशील गावातील नागरिकांशी संवाद साधला. सी-६० जवानांचा गणवेश परिधान करून एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश त्यांनी दिला.  जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. मी यापूर्वीही दोन वेळा गडचिरोलीत मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करत आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असे त्यांनी सांगितले. 

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी दामरंचा, ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. सोबतच सी ६० जवानांचा सत्कारदेखील केला. दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एकल भवनाचे लोकार्पण केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगमाचा आढावा घेत विविध निर्देश दिले.

शहरी नक्षलवाद मोठी समस्या

आज शहरी नक्षलवादाची मोठी समस्या आहे. पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांची दिशाभूल करून ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे जाळे ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते. गडचिरोलीत ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याचे काम मोठय़ा प्रमाणात होत आहे. सूजरागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येते आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

रस्ते, पोलीस केंद्रांना विरोध चुकीचा

एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा या सीमेवरील गावात मागील दीड महिन्यापासून आदिवासी आंदोलनाला बसले आहेत. त्यांचा प्रस्तावित खाणी, रस्ते बांधकाम व पोलीस मदत केंद्रांना विरोध आहे. आदिवासींची दिशाभूल करून काही शक्तींनी त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. त्यावर आमची नजर असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यार्थिनींची गळ.. यावेळी ग्यारापत्ती येथील विद्यार्थिनींनी फडणवीस यांना विशेष विनंती केली, ती ऐकून सर्वानीच त्यांच्या विनंतीला दाद दिली, तर फडणवीस यांनी सुध्दा त्यांची मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आम्हाला शाळेत जाण्यासाठी एसटी बस हवी, करोनानंतर दोन वर्षांपासून गावात बस आली नाही. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पण बस नसल्याने शिक्षणात खंड पडत आहे, असे विद्यार्थिनींनी सांगितले. त्यांचे म्हणणे एकूण घेत फडणवीस यांनी मागणी लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Story img Loader