नागपूर : देशात सर्वच कमी – अधिक प्रमाणात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. २०१२-१३ मध्ये देशात प्राधिकरणाकडून रस्त्यांवर १७ हजार ३७७.७९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०२१-२२ मध्ये हा खर्च १ लाख ७२ हजार ३०१.७० कोटींवर गेला. २०१२-१३ च्या तुलनेत रस्त्यांसाठीच्या निधीत तब्बल दहा पट वाढ नोंदवल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

देशात २०१३-१४ मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रस्त्यांवर २० हजार ६०१.३१ कोटी रुपयांचा खर्च केला. २०१४-१५ मध्ये हा खर्च वाढून २३ हजार ७८९.७२ कोटी होता. २०१५-१६ मध्ये हा खर्च ४२ हजार ६८९.४९ कोटी, २०१६-१७ मध्ये हा खर्च ४८ हजार ८५७.५१ कोटी, २०१७-१८ मध्ये हा खर्च ८३ हजार २३०.५८ कोटी, २०१८-१९ मध्ये हा खर्च ९५ हजार २०६.६४ कोटी, २०१९-२० मध्ये हा खर्च १ लाख ४ हजार ६४.४१ कोटी, २०२०-२१ मध्ये हा खर्च १ लाख २५ हजार ३५०.४१ कोटी, २०२१-२२ मध्ये हा खर्च १ लाख ७२ हजार ३०१.७० कोटी होता. त्यामुळे, गेल्या पाच वर्षांत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला रस्त्यांसाठी भरभरून निधी मिळाल्याचेही माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले. या खात्याची जबाबदारी नागपूरकर असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे, हे विशेष.
खासगी क्षेत्राने केलेल्या निधीत मात्र घट

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?

खासगी क्षेत्राने केलेल्या निधीत मात्र घट

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील रस्त्यांवर खासगी क्षेत्राने २०१२-१३ मध्ये १९ हजार ८८६.५२ कोटींचा खर्च केला होता. हा खर्च २०१३-१४ मध्ये २१ हजार १५५.४७ कोटी, २०१४-१५ मध्ये १७ हजार २९३.१२ कोटी, २०१५-१६ मध्ये २७ हजार ३६७.९६ कोटी, २०१६-१७ मध्ये १५ हजार ४५३.६४ कोटी, २०१७-१८ मध्ये १६ हजार ४१३.६४ कोटी, २०१८-१९ मध्ये २१ हजार ६०५.३२ कोटी, २०२०-२१ मध्ये १२ हजार ४७५.५३ कोटी, २०२१-२२ मध्ये १९ हजार २०६.१४ कोटी रुपये नोंदवल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.