महाविकास आघाडीत वरवर जरी सगळं सुरळीत चालत असलेलं दिसलं तरी आतमध्ये अनेक कुरबुरी चालतचं असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळस त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या जोरदार टीका केली आहे.

किर्तीकरांचा रोहित पवारांना इशारा

राज्यातील महाविकास आघाडी तयार करण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार हे रोहित पवारांचे आजोबा असल्यामुळे पवार कुटुंबाला राजकारणाची मोठी परंपरा असून त्याची जान राजकारण करताना ठेवणे आवश्यक असल्याचे किर्तीकर म्हणाले. त्यामुळे रोहित पवारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाब टाकण्याचे धंदे बंद करावेत, अशा स्पष्ट शब्दात इशारा किर्तीकरांनी रोहित पवारांना दिला आहे.

शिवसैनिकांची तक्रार

नगर जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियानानिमित्त गजानन किर्तीकर सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत. तसेच “पवारांनी मतदारसंघाच्या विकास कामांमध्ये शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे आणि आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिकही बांधिल राहणार नाहीत” असेही किर्तीकर म्हणाले. रोहित पवार मतदारसंघाच्या कामांमध्ये सहभागी करून घेत नसल्याची तक्रार काही शिवसैनिकांनी किर्तीकरांकडे केली होती. यावरून मतदारसंघातील वातावरण आणखीनच बिघडल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader