मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही जल्लोष साजरा केला जात आहे. विधानभवन परिसरातच काँग्रेस नेत्यांनी पेढे भरवत अभिनंदन केलं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> राहुल गांधींना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ खटल्यात दिला ‘हा’ निर्णय

“दोष नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं पाप केलं गेलंय. राहुलजी माफी मागणार नाहीत. आधीही मागितली नव्हती. गांधी आहेत ते. गांधी कभी माफी मांगते नहीं. या देशासाठी गांधींनी समर्पण दिलंय, बलिदान दिलंय. या देशासाठी त्यांनी रक्त वाहिलंय”, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं.

“सत्याचा विजय झाला आहे. आजचा निकाल म्हणजे संविधानाचा विजय आहे. द्वेषाविरोधातील ही मोठी चपराक आहे. राहुला गांधींचा आवाज देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचेल. येणाऱ्या दिवसांत देशातील हुकूमशाहीला नष्ट केलं जाईल. ज्याची नियत प्रामाणिक असेल, ज्याची मेहनत शुद्ध असते त्यांच्याबाबतीत असा निकाल लागतो.”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने?

“आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? त्यापेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi never apologizes wadettiwars reaction after sc verdict said dedication to country sgk
Show comments