Ganeshotsav 2022 Updates : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आज सार्वजनिक मंडपात आणि घरोघरी आगमन होणार आहे. यापार्श्वभूमीवर गणेश मूर्ती आणि पूजेच्या साहित्यासाठी बाजारपेठादेखील सजल्या आहेत. पुढील ११ दिवस देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असेल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील विविध सार्वजनिक मंडळांचे देखावेही तयार झाले आहे. तर मुंबईतील प्रमुख मंडळांनी गणरायाची मूर्ती मुख्य सभामंडपामध्ये आणल्या आहेत. उर्वरित मंडळातील कार्यकर्त्यांचीदेखील लगबग वाढल्या असून प्रत्येक जण आपली जबाबदाऱ्या पार पाडतो आहे. एकंदरित सर्वच गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

Live Updates

Ganesh Utsav 2022 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील विविध सार्वजनिक मंडळांचे देखावे तयार

20:41 (IST) 31 Aug 2022
उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चं घेतलं दर्शन

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सुपूत्र तेजस ठाकरे हेही होते. मुंबईच्या राजाच्या चरणी ठाकरे कुटुंब नतमस्तक झालं आहे. यावेळी हजारो भक्त याठिकाणी दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर गर्दीतून वाट काढत ठाकरे कुटुंब परत गेले आहेत.

16:45 (IST) 31 Aug 2022
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

यावर्षीच्या गणेशोत्सवाकरिता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असून सहभागी गणेश मंडळांकडून २ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...

15:46 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान

साताऱ्यात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात झाले आहे. सनई चौघाड्यांच्या निनादात पालखीतून गणेशाची वाजतगाजत मिरवणूक पोवई नाक्यावरील निवासस्थानापर्यंत काढण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.

15:43 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन; सपत्नीक केली पूजा

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झाल आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर धस यांनी गणरायाची पूजा केली. यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारली त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. गणरायाच्या आगमना बरोबरच पावसाचे आगमन होऊन शेतक-याचे संकट दूर व्हावं असं साकडं धस यांनी बाप्पाकडे घातले आहे.

15:40 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाचं आगमन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. गेल्या २९ वर्षांपासून आमच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा होते आहे. बाप्पाच्या आगमनाने समृद्धीचं वातावरण परिवारात तयार होत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर व्हावं, रोगराई दूर व्हावी, चांगले दिवस यावे, हीच इश्वरचरणी प्रार्थना, करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

15:37 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : खामगावात मानाच्या लाकडी गणपतीची स्थापना

आज देशभरात गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातही गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा गणेश उत्सव साजरा होत आहे. यामध्ये आज खामगाव येथील मानाच्या लाकडी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दीडशे वर्षापासूनची ही परंपरा या ठिकाणी जोपासल्या जात आहे. खामगाव शहरातील सराफा भागात लाकडी गणपती स्थापना करण्यात आली आहे.

15:33 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : राजभवनातही गणरायाचे उत्साहात स्वागत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवनातील निवासस्थान असलेल्या ‘जलभूषण’ येथे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. राज्यपाल कोश्यारी यांनी गणरायाचे स्वागत केले तसेच राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटूबियांसोबत बाप्‍पाची आरती व पूजा केली.

15:32 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : अमोल मिटकरी यांच्या घरीही गणरायाची प्रतिष्ठापना

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरीही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आजपासून राज्यभरात गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे. ढोल ताशाच्या गजरात मिटकरी यांच्या घरी बाप्पाचं आगमन आगमन झाले.

13:11 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : अभिनेता सुबोध भावेच्या घरी विराजमान झाले बाप्पा

अभिनेता सुबोध भावेच्या घरी विराजमान झाले बाप्पा

व्हिडीओ पाहाण्यासाठी क्लिक करा

13:07 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : पुण्यात मानाचा कसबा गणपती मंडपात विराजमान

पुण्यातील मानाचा पहिला गणपती मानला जाणाऱ्या कसबा पेठेतील गणपतीची मुर्ती मंडपात विराजमान झाली आहे.

11:54 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘वर्षा’वर गणरायाची प्रतिष्ठापना

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. घराघरात गणपती बाप्पांचं भक्तीभावाने आगमन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

11:53 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन

काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या घरीदेखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी भाई जगताप यांनी गणरायाची आरती ओवाळून मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

11:50 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन

आज राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचे आगमन होते आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बप्पाचे आगमन झाले आहे.

11:38 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : धुळ्यात वाजत गाजत लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना

धुळे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली असून, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड येथे नागरिकांनी गणेश मूर्तीसह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. धुळे जिल्हातील मानाचा समाजाला जाणाऱ्या खुनी गणपतीचीदेखील वाजत गाजत पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली आहे.

11:32 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंच्या हस्ते संस्थान गणपतीची पुजा

शिवसेनेचे माजी खासदार व उपनेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संस्थान गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे यांनी यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. यावेळी औरंगाबाद शहराचे माजी महापौर नंदकुमार घडले, हेही उपस्थित होते.

10:46 (IST) 31 Aug 2022
पुणे : गर्दी वाढल्यास वाहतुकीत बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने

गणेशोत्सवात मध्यभागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यासह उपरस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

10:45 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : अभिनेता कार्तिक आर्यनने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

नवसाला पावणारा बाप्पा अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. याच कारणामुळे या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भगणेशभक्त येथे हजेरी लावतात. २९ ऑगस्ट सायंकाळी सात वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक सार्वजनिक करण्यात आली होती. आज अभिनेता कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

10:39 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : अकोल्यात श्री बारभाई गणेशोत्सवाला सुरूवात

अकोल्यातील श्री बारभाई गणपती उत्सवाला अकोल्यात सुरूवात झाली आहे. हा गणपती केवळ अकोल्यात नव्हे तर, संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. हा गणपती विविध जाती धर्माच्या एकतेचे प्रतीकही आहे. श्री बारभाई गणपतीला गणेशोत्सवात मानाचा गणपती म्हणून विशेष मान आहे. गणेश उत्सवामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून हा गणपती प्रथम क्रमांकावर असतो.

10:28 (IST) 31 Aug 2022
Ganesh Utsav 2022 : पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

पुणे शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले असून पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने श्रींची मुख्य मंदिरापासून गरुड रथातून आगमन मिरवणुकीला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. देऊळकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधूंची सनई तसेच दरबार ब्रँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग घेतला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी होणार आहे.

गणेश चतुर्थी २०२२

गणेश चतुर्थी २०२२

मुंबईतील प्रमुख मंडळांनी गणरायाची मूर्ती मुख्य सभामंडपामध्ये आणल्या आहेत. उर्वरित मंडळातील कार्यकर्त्यांचीदेखील लगबग वाढल्या असून सदस्यांना जबाबदाऱ्या आखून देण्यात येत आहेत.

Story img Loader