Ganesh Festival 2024 Live: आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी राज्यभरातील गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तसाच उत्साह देशभरात आणि विदेशातही गणरायाची मोठ्या भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या भाविकांमध्ये दिसून येत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून जल्लोषात बाप्पांची मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं जात आहे. गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषात एकीकडे भक्तमंडळी लीन असताना दुसरीकडे पोलीस दलाकडून सुरक्षेत कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

Live Updates

Ganeshotsav 2024 Live Updates: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रभरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन!

21:24 (IST) 7 Sep 2024
एमआयएमचा महाविकास आघाडीला युतीबाबतचा शेवटचा प्रस्ताव; इम्तियाज जलील म्हणाले...

भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी एमआयएम पक्षाने मविआला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण मविआच्या नेत्यांनी त्यावर विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे ९ सप्टेंबरपर्यंत मविआने निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ, असा इशारा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

16:47 (IST) 7 Sep 2024
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील यांची गिरीश महाजनांच्या घरी उपस्थिती

हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत गिरीश महाजन यांच्या घरी बाप्पांच्या आगमनावेळी उपस्थिती लावली. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या घरी उपस्थिती लावल्यामुळे ते भाजपामध्येच राहणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

16:28 (IST) 7 Sep 2024
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, गाणं गायला सांगताच म्हणाल्या...

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज खूप सुंदर दिवस आहे. बाप्पांचं आगमन झालं आहे. सगळीकडे सुख-समृद्धी आहे याचा आनंद आहे. गायला सांगू नका, आज माझा घसा खबार झाला आहे. बाप्पांकडे एवढंच साकडं घातलं आहे की महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं असेल, ते व्हावं, महाराष्ट्राचा प्रगतीच्या दिशेनं प्रवास व्हावा आणि त्यात कोणतीही अडचण येऊ नये, सर्व अडचणी दूर व्हाव्यात. मी नक्की गायले असते, दरवेळी मी गाते, पण आज माझा घसा पूर्णपणे बसला आहे - अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

14:42 (IST) 7 Sep 2024
वर्धा : ‘ ग्रीन गणेशा ‘! यावर्षी सावंगीचा गणेश देणार निसर्गप्रेमाचा संदेश

वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा सांस्कृतिक महोत्सव आणि श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती ट्रस्टच्या गणेशोत्सवाचा आरंभ आज गणरायाच्या आगमनाने झाला.

सविस्तर वाचा...

14:27 (IST) 7 Sep 2024
Ganesh Utsav 2024 Pune: गणेशोत्सवात भाविकांसाठी २७ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था

शहराच्या मध्यभागात मानाच्या गणपतींचे दर्शन, तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर, तसेच जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 7 Sep 2024
Pune Kasba Ganpati: पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं जल्लोषात स्वागत!

पुण्यातील कसबा गणपतीचं जल्लोषात स्वागत

https://x.com/LoksattaLive/status/1832303976106115312

13:07 (IST) 7 Sep 2024
Ganesh Utsav 2024 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन! सिंह रथातून निघाली मिरवणूक, ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत, पाहा Viral Video

Shrimant Dagdusheth Ganpati Arrival : Ganesh Utsav 2024 Pune : पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 7 Sep 2024
Devendra Fadnavis Mocks Oppositions: देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!

बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. पण सर्वांना सद्बुद्धी मिळो, अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. गणेशाने सर्वांचे दु:ख हरावे, सर्वांचे विघ्न दूर करावे, महाराष्ट्राला स्थैर्य व भरभराट मिळावी अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना केली आहे. मला विश्वास आहे की अतिशय उत्साहात हा गणेशोत्सव महाराष्ट्रात व देशात साजरा होईल - देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान

12:05 (IST) 7 Sep 2024
अकोला : गणेशोत्सवावर महागाईचे ‘विघ्न’,मूर्तीच्या किंमतीत २० % वाढ

अकोला : वाजतगाजत गणरायाचे आगमन आज होत आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जोमाने तयारी करण्यात आली.

सविस्तर वाचा...

11:59 (IST) 7 Sep 2024
CM Eknath Shinde News: बाप्पा विरोधकांसह सगळ्यांना सुबुद्धी देवो - एकनाथ शिंदे

बाप्पा विरोधकांसह सगळ्यांना सुबुद्धी देवो. आज गणरायाचं आगमन झालं आहे. सर्व नागरिकांना व गणेशभक्तांना मी खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांच्या जीवनात गणपती बाप्पा सुख, समृद्धी व आनंद घेऊन येवो अशा शुभेच्छा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</p>

11:31 (IST) 7 Sep 2024
First Transgender Dhol-Tasha Troup Shikhandi: पुण्यात पहिल्या तृतीयपंथी ढोलताशा पथकाचं सादरीकरण!

पुण्यात महाराष्ट्रातील शिखंडी या पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकानं भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळात सादरीकरण केलं.ृ

https://x.com/ANI/status/1832296621431750942

10:46 (IST) 7 Sep 2024
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन; महिला अत्याचारा संदर्भात गणपती बाप्पांकडे साकडे

पिंपरी -चिंचवड: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी इको फ्रेंडली गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. यावर्षी बाल गणेश सोनालीच्या घरी विराजमान झाले आहेत. महिलांना समाजात सुरक्षित आणि स्वातंत्र्याने जगता यावं, यासाठी सोनालीने गणपती बाप्पांकडे साकडे घातले आहे. सोनाली आणि सोनालीचा भाऊ गेल्या पाच वर्षांपासून शाडू माती पासून गणपती बनवतात. यावर्षी देखील सोनालीने बाल गणेशाचे रूप साकारत सुरेख आणि सुबक अशी मूर्ती बनवलेली आहे. तेच बप्पा सोनालीच्या घरी विराजमान झाले आहेत.

सोनाली म्हणाली, प्रत्येक वेळी आपण केवळ महिला अत्याचारांवर बोलतो. पीडितांना न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढतो. आपण रस्त्यांवर देखील उतरतो. सोशल मीडियावर अनेक गोष्टी पोस्ट करतो. हे असं चक्र फिरतच राहतं. परंतु, हे चक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यातून मार्ग काढला पाहिजे. अशा पद्धतीने रस्त्यांवर येऊन न्याय मागण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा सोनालीने व्यक्त केली आहे.

10:16 (IST) 7 Sep 2024
Lalbagcha Raja: लालबागचा राजाचं पहिलं दर्शन!

लालबागचा राजाचं पहिलं दर्शन!

https://x.com/ANI/status/1832236680381649024

10:09 (IST) 7 Sep 2024
Mulundcha Raja Mandal Worker Accident: मुंबईत गणपतीच्या पहिल्याच दिवशी गणेश मंडळ कार्यकर्त्याचा अपघातात मृत्यू

मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू, भरधाव कारनं पहाटे ४ च्या सुमारास दिली धडक, दुसरा गंभीर जखमी

https://x.com/ANI/status/1832260365943763193

09:33 (IST) 7 Sep 2024
History, Culture and significance of Ganesh: ‘महाविनायक’ गणरायाचे ‘अफगाणिस्तान कनेक्शन’ काय आहे?

History, Culture and significance of Ganesh: गणपती, गणराय हा प्राचीन काळी विनायक म्हणून ओळखला जात होता. त्याचे सर्वात प्राचीन पुरावे कोणत्या साहित्यात किंवा जगभरात कुठे सापडतात आणि का?शिवाय, त्याचे सुरुवातीचे अंकन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात का सापडते याचा घेतलेला हा संशोधनात्मक शोध आणि आढावा!

वाचा सविस्तर

09:31 (IST) 7 Sep 2024
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीनिमित्त WhatsApp, Facebook वर तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी खास मराठी शुभेच्छा! पाहा यादी…

Happy Ganesh Chaturthi 2024 Wishes Quotes : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमन झाले आहे, हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाची सुरुवात शनिवारी, ७ सप्टेंबर २०२४ रोजी झाली आहे. या विशेष दिवशी प्रथम देवता श्रीगणेशाची मनोभावे पूजा केली जाते. अशा या गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिनानिमित्त तुम्ही तुमच्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना, प्रियजनांना खास मराठीतून WhstsApp, Facebook Instagram Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक शुभेच्छा घेऊन आलो आहोत. (वाचा सविस्तर)

09:30 (IST) 7 Sep 2024
Ganesh Festival 2024: गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू

मुंबईतील मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू, एक गंभीर जखमी!

https://x.com/ANI/status/1832260365943763193

09:26 (IST) 7 Sep 2024
Narendra Modi on Ganesh Festival 2024: मोदींच्या देशवासीयांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा!

समस्त देशवासियों को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया!

https://x.com/narendramodi/status/1832251747571564968

09:14 (IST) 7 Sep 2024
Lalbagcha Raja Darshan: लालबाबगचा राजा दर्शन!

लालबागचा राजाचं पहिलं दर्शन!

https://x.com/PTI_News/status/1832241511670440228

09:01 (IST) 7 Sep 2024
Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातच मिळते राजकारणाचे बाळकडू…

गणेशोत्सवात मंडळाच्या मंडपात मिळणारे हे जीवनाच्या वास्तवतेचे ज्ञान पुढे राजकारण, समाजकारण करताना उपयोगी पडते.

वाचा सविस्तर

08:58 (IST) 7 Sep 2024
गणेश चतुर्थी, ७ सप्टेंबर पंचांग: बाप्पाच्या आगमनाने कोणत्या राशीला होणार सुवर्णलाभ? व्यापारी वर्गाची चांदी तर धनलाभाचे योग जुळणार; वाचा तुमचे भविष्य

7th September Rashi Bhavishya & Marathi Panchang : आज गणपती बाप्पा मेष ते मीन राशीच्या आयुष्यात काय खास घेऊन येणार हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या...

वाचा सविस्तर

08:57 (IST) 7 Sep 2024
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला ‘हे’ चार शुभ योग, जाणून घ्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजा वेळ

हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०१ वाजता सुरू होत आहे आणि ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३७ वाजता समाप्त होईल.

वाचा सविस्तर

08:56 (IST) 7 Sep 2024
Ganesh Festival 2024: “मिरवणुकीत गणवेशात नाचू नका, नाहीतर…”, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी; कारवाईचा इशारा!

Ganesh Festival 2024: गणेशोत्सवानिमित्त मुंबईत सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली असून आयुक्तांनी पोलिसांना गणवेशावर न नाचण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा सविस्तर

08:54 (IST) 7 Sep 2024
Ganesh Festival 2024: पोलीस आयुक्तांचे पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश...

“६ सप्टेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान गणवेशात नृत्य करण्यास मनाई केली आहे. तसेच, असे करताना कोणता पोलीस अधिकारी वा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे”, असं विवेक फणसाळकर या बैठकीत म्हणाल्याचं वृत्त मुंबई पोलिसांच्या हवाल्याने एएनआयनं दिलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1832125571662512367

Markets are crowded on the occasion of Ganoshotsav 2024

चैतन्योत्सव...; गणोशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी,कार्यकर्त्यांची लगबग ( फोटो सौजन्य : @TIEPL)

Ganesh Chaturthi Latest Updates: कलाकार, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी ते सामान्य नागरिकांच्या घरातही बाप्पांचं मोठ्या भाक्तीभावाने स्वागत करण्यात येत आहे.