सर्वाच्या लाडक्या विघ्नहर्ता गणरायाचे  २ सप्टेंबरला  घरोघरी आगमन होणार आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत. रायगड जिल्ह्यत २६८ ठिकाणी सार्वजनिक तर ९९ हजार ९२ घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात आज अक्षरश: झुंबड उडाली होती.

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत आणि घरोघरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात नेहमीच उत्साह संचारलेला असतो.  कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह वेगळाच असतो . रायगड जिल्हयात आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी काही दिवस आधीपासून जय्यत तयार करण्यात आली आहे. यावर्षी थर्माकोलच्या मखरांना पर्याय म्हणून कागदाचे, पुठ्ठय़ाचे तसेच लाकडी मखरांना भाविकांनी पसंती दिली आहे.

तर सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक, पौराणिक देखावे साकारण्यात येत आहेत . पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल असल्याचे पहायला मिळत आहे.

२ सप्टेंबरपासून१२ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. १५ हजार ६७६ ठिकाणी गौरींची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवात मुंबई—गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या जास्त असल्याने त्याअनुषंगाने वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियंत्रणठेवले आहे.

यावर्षी गणेशोत्सवात पावसाचा व्यत्यय आला असला तरी  भाविकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.  आवश्यक साहित्यांनी रायगड जिल्ह्य़ातील बाजारपेठा फुलल्या आहेत . लाडक्या बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी आरास , सजावटीचे साहित्य तसेच पूजेसाठी , शोभेसाठी फुले , फळे यांचीखरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे . गौरीपूजेसाठी लागणारी सुपेही बाजारात आली विRीसाठी उपलब्ध आहेत . यंदा महागाईचा फटका गणेशभक्तांना बसतो आहे.  प्रसाद , मोदक यांचे भाव किलोमागे ५० रूपयांनी वाढले आहेत तर फळांचा भावदेखील वधारला आहे. काही दिवसांपूर्वी  भाव मिळत नसलेला झेंडूदेखील भाव खावू लागला आहे आकाराप्रमाणे १५० ते २०० रूपये असा सध्या झेंडूचा दर आहे . बाजारात भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलीसांनी वाहतूकीचे नियोजन केले आहे.

Story img Loader