सांंगली :  मंगळवारी सकाळी सुरू  झालेली मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुक बुधवारी सकाळी दहा वाजलेतरी सुरू असून मिरवणुक संपण्यास दुपारी दीडपर्यंत वेळ लागेल. यंदा मिरज शहरातील २२३ सार्वजनिक मंडळाच्या श्रींचे विसर्जन मिरवणुक सलग 30 तास चालेल असा अंदाज आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता महापालिका कर्मचारी मंडळाच्या सार्वजनिक गणेशमुर्तीची विसर्जन मिरवणुक सुरू झाली. साडेनउ वाजता या मंडळाच्या श्रींचे गणेश तलावात विसर्जन झाले. यानंतर टाळमृदंगाच्या तालात पालखीतून शिवाजी तरूण मंडळाच्या श्रींचे  विसर्जन करण्यात आले. अनंतचतुर्दशी दिवशी शहरातील २२३ सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जन गणेश तलाव आणि कृष्णा घाट येथे करण्याचे नियोजन होते.

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

हेही वाचा >>> Maa Amruta : “अमृता फडणवीसांना आजपासून मॅडम नाही, माँ अमृता संबोधणार”, भाजपा आमदाराचं विधान चर्चेत!

दिवसभर मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळांची संख्या  मोजकी होती. मात्र, सायंकाळपासून अनेक मंडळाच्या मिरवणुका सुरू झाल्या. जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेला प्रखर प्रकाश झोतातील विद्युत रोषणाईस बंदी आदेश झुगारून अनेक मंडळांच्या देखाव्यात लेसर किरणाचा वापर करण्यात आला होता. बहुसंख्य मंडळांकडून यंदाही ध्वनीमर्यादेचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. ध्वनी मापक यंत्रणेकडून ध्वनीवर्धकातून प्रसारित करण्यात येत असलेल्या ध्वनीचे मोजमाप करण्यात आले. त्यावेळी १२० हून अधिक डेसिबल ध्वनी असल्याचे आढळून आले. अनेक मंडळाच्या ध्वनीव्यवस्थापन करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलीस पथकाकडून नोटीसाही बजावण्यात आल्या. मात्र, या नोटीसांना न जुमानता, बंदी आदेशाचे  सर्रास उंघन  यावेळी पाहण्यास मिळाले.

रात्री बारावाजता मिरवणुकीतील वाद्ये बंद करण्यात आली. यानंतर गर्दी कमी झाली असली तरी मिरवणुक मार्गावर शंभरहून अधिक गणेशमुर्ती होत्या. सकाळी नउ वाजता शहरातील मोठ्या `१३ गणेश मुर्तींचे विसर्जन व्हायचे होते. मोठ्या मुर्ती असल्याने क्रेनच्या मदतीने एका गणेश मुर्तींचे किमान एक तास लागत होता.

हेही वाचा >>> Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

मिरवणुकीतील आवाज  असह्य होत असल्याने मिरवणुक पाहण्यास आलेल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करण्यात येत होती. कानात कापूस घालूनच गणेशभक्त मिरवणुकीचा आनंद  लुटत असल्याचे दिसले. विसर्जन मिरवणुकीच्या दोन किलोमीटर मार्गावर दहाहून अधिक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. यामध्ये हिंदू एकता आंदोलन, मराठा महासंघ, शिंदे शिवसेना, उबाठा शिवसेना, मनसे, विश्‍वशांती मंडळ, संभाजी तरूण मंडळ, विश्‍वश्री पैलवान मंडळ आदींच्या स्वागत मिरवणुका होत्या. तर जनसुराज्य शक्ती, भाजप, महापालिका, किशोर जामदार मित्रमंडळ आदींनी स्वागत कक्ष उभारले होते. मिरवणुकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, युवा नेते सुशांत खाडे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष संमित कदम, प्रा. मोहन वनखंडे, शिवसेनेचे तानाजी सातपुते, सिध्दार्थ जाधव, हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, परशुराम चोरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब वनमोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे, सी. आर. सांगलीकर आदींसह अनेक राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.