कोपरगाव : शहरातील कापड बाजार भागातील असलेल्या जुन्या गोकर्ण गणेश मंदिरात गणेश जयंती धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यात आली. या वर्षी ‘करोनाचे संकट त्वरित जाऊ दे’ असे साकडे श्रीगणेशाला भाविकांनी घातले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर गणेश मूर्तीला गुलाब पुष्प पानाफुलांनी सजवण्यात आले होते. सकाळी महामस्तकाभिषेक प्रमुख विश्वस्त सुभाष महाजन यांच्या हस्ते तसेच होमहवन पूजा विधी पाच जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील ब्रह्मवृंद सुरेश शास्त्री जोशी, रमेश लुंपाटकी गुरुजी, बाळशास्त्री जोशी, वैभव शास्त्री जोशी, प्रवीण पदे, मुख्य पुजारी मुकुंद कालकुंद्री आदींच्या हस्ते वेदमंत्र उच्चारात होमहवन महाआरती करण्यात आली. तसेच करोना काळात गोरगरिबांच्या सेवेसाठी व मदतीसाठी धावून आले, अशा पाच जोडप्यांचा सपत्नीक सत्कार या वेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रसंचालक विजय जोशी यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज गायकवाड, अनिल व सुनील भावसार बंधू, हरीश शर्मा, किशोर काळे, प्रशांत खैरनार, नरेंद्र इनामके, मनोज बोधले ,पप्पू अमृतकर, जवाहर गुजराती यांच्यासह गणेश भक्त कार्यकर्त्यांनी सहकार्य दिले. या वेळी भाविकांना अन्नदानाचे वाटप या वेळी करण्यात आले, अशी माहिती विजय जोशी यांनी दिली.