“भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अशा शब्दांमध्ये टीका करणारे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना शिंदे यांच्या खासदार पुत्राने उत्तर दिलं आहे. राज्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सत्तांतरणानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेक नेत्यांच्या घरी भेटीगाठी देत आहेत. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे पक्ष सचिव मिलिंद नार्वेकरांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणेंपर्यंत आणि उद्योगपती मुकेश अंबांनीपासून आमदार प्रसाद लाड यांच्यापर्यंत अनेकांच्या घरी शिंदे मागील काही दिवसांमध्ये गणेश दर्शनासाठी जाऊन आले आहेत. मात्र याच गणपती दर्शनाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी टोला लगावल्यानंतर त्या टोल्यावरुनच शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी फिल्मी स्टाइल उत्तर दिलं आहे.
नक्की पाहा >> CM शिंदेंच्या निवासस्थानी फडणवीसांना मिळाला आरतीचा मान तर PM मोदींनी ‘या’ नेत्याच्या घरी केली गणपतीची आरती; पाहा Photos
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा